घरमहाराष्ट्रमद्यधुंद चालकाचा सांगलीत धुमाकूळ

मद्यधुंद चालकाचा सांगलीत धुमाकूळ

Subscribe

मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवत कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. रस्त्यावरील दहा वाहनांना त्याने धडक दिली. कॉलेज कॉर्नरवर रस्त्यावर बोलत उभा राहिलेल्या दोघांच्या अंगावर ट्रक घातला. सुदैवाने ते बचावले. नागरिकांनी पाठलाग करुन चालक संजय नागू राऊत (वय ३५) या यास पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून राऊत हा दहिवडीचा रहिवाशी आहे.

संजय राऊत गुरुवारी मार्केट यार्डात ट्रकने माल घेऊन आला होता. माल उतरल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले. त्याला चालताही येत नव्हते. तरीही तो ट्रक चालविण्यास बसला. टिंबर एरियातून कॉलेज कॉर्नरमार्गे तो शहरात घुसला. कॉलेज कॉर्नरवर दोघेजण बोलता उभा होते. राऊतने प्रथम त्यांच्या अंगावर ट्रक घातला. प्रसंगावधान ओळखून हे दोघे बाजूने झाल्याने बचावले. त्यानंतर राऊत आमराई, गणपती पेठमार्गे टिळक चौकात गेला. तेथून तो गावभागात घुसला.

- Advertisement -

या परिसरातील रस्ते अरूंद असल्याने नागरिकांनी घरासमोर तसेच रस्त्यावरच लहान-मोठी वाहने पार्क केली होती. राऊतने सलग सात दुचाकी वाहनांना चिरडले. याशिवाय दोन मोटारीसह एका जीपला ठोकत नेले. यामध्ये तिनही वाहनांचा चुराडा झाला. वाहनांना ठोकरल्याचा आवाज आल्याने नागरिक जागे झाले. त्यांनी हा प्रकार पाहून ट्रकचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर नागरिकांनी ट्रक अडविला.चालक राऊत यास खाली उतरण्यास सांगितले. पण त्याला व्यवस्थीत बोलताही येत नव्हते. तो ट्रकमधून उतरण्यास तयार नव्हता. शेवटी नागरिकांनी त्याला खाली ओढले. तो मद्यप्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला चांगलाच चोप देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -