घरमहाराष्ट्रउद्या कोरोना लसीकरणाचं राज्यात होणार ड्राय रन; 'या' चार जिल्ह्यांची निवड

उद्या कोरोना लसीकरणाचं राज्यात होणार ड्राय रन; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

Subscribe

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड

देशभरात उद्यापासून कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जाणार आहे.

- Advertisement -

या ठिकाणी होणार लसीकरणाचा ड्राय रन

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

ड्राय रन म्हणजे काय?

कोणतीही लस लोकांना देण्यापूर्वी त्या लसीची तपासणी केली जाते. कारण जर त्या लसीमध्ये काही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे ड्राय रन केल्याशिवाय लसीचा डोस लोकांना दिला जात नाही. केवळ त्या लोकांचा डेटा अपलोड केला जातो. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाइन डेटा सिक्युरिटी यासारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या जातात.


नव्या वर्षात देशातील सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन; केंद्राचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -