घरCORONA UPDATEराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला लसीकरणाचा ड्राय रन - राजेश टोपे

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला लसीकरणाचा ड्राय रन – राजेश टोपे

Subscribe

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरण आणि नव्या विषाणूसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजेश टोपे यांनी लसीकरण आणि नव्या स्ट्रेन संदर्भात माहिती दिली. विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव वेगानं होतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहे हे जाणून घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. याशिवाय, राज्यात नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण सापडले असून नव्या स्ट्रेनची लागण झालेल्यांच्या संपर्कात येऊन अद्याप कुणीही पॉझिटिव्ह आलं नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्रायरन होणार आहे. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण न येता हा सर्व कार्यक्रम राबवता यावा यासाठी हे सर्व सुरु आहे. येत्या ८ जानेवारीला ड्राय रन सुरु होईल. दरम्यान, नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आणखी ८ रुग्ण आढळले आहेत. नवीन विषाणू झपाट्याने पसरतो, त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे, काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पण घाबरण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -

नियम जनहितासाठी आहेत, एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी ते पाळले पाहिजेत. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्याच्या वर कोणीही नाही, याचा विचार करुन सर्वांनी वागलं पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले. सध्या २ ते ३ हजार नवीन रुग्ण दरदिवसा आढळत आहेत. पूर्वी हे प्रमाण २५ ते ३० हजार होतं. तर रिकव्हरी रेट ९६ टक्के आहे, त्यामुळे सर्व नियंत्रणात आहेत. नवीन स्ट्रेनबाबत आम्ही सतर्क आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमलबाजावणी कायम ठेवणार, आहोत. तसं आम्ही केंद्राशी पत्र व्यवहारकरून इतर राज्यात देखील प्रोटोकॉल कायम राहावा हे सांगणार आहोत. जेणेकरून इतर राज्यातून आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू नये.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, कोरोना लस संदर्भात केंद्राने किमान खर्च करावा. गरिबांना लस मोफत देण्यात केंद्राने मदत करावी. जर केंद्राने तसं केलं नाही तर राज्यातील अखत्यारीतील लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्याची माहिती आम्ही केंद्राला सांगितली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -