घरताज्या घडामोडीकरोनाच्या भीतीने शहापूरमधील आदिवासींच्या रोजगारावर संक्रांत!

करोनाच्या भीतीने शहापूरमधील आदिवासींच्या रोजगारावर संक्रांत!

Subscribe

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र इमारतींची बांधकामे आणि विटभट्टयांची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे याचा फटका आदिवासींच्या रोजगारावर झाला आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण भारत देशात लॉकडाउन केला आहे. या र्निबंधामुळे विविध उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा फटका रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरीत होणाऱ्या गोरगरीब आदिवासी कुटुंबांना देखील बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब , खर्डी, कसारा, परिसरातील दुर्गम भागातील आदिवासी दरवर्षी दिवाळीच्या सणानंतर म्हणजेच डिसेंबरच्या अखेरीस कल्याण, भिवंडी, ठाणे, वसई, विरार, भाईंदर, मीरारोड, वापी, बलसाड या भागातील वीट भट्टयांवर तसेच इमारतींच्या बांधकामावर मजूरीसाठी जातात. आपले गाव सोडून इतरत्र स्थलांतरीत झालेले हे आदिवासी मजूर वीटभट्टी आणि इमारती बांधकाम नजीकच झोपड्या करुन ते आपला संसार थाटतात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून करोनाच्या प्रादुर्भावाच्यामुळे सर्वत्र इमारतींची बांधकामे आणि विटभट्टयांची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे याचा फटका आदिवासींच्या रोजगारावर झाला आहे. दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल या भीतीने घाबरलेली हजारो स्थलांतरीत आदिवासी कुटुंबांना पुन्हा आपल्या मूळ गावी परतावे लागले आहे.

आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये भयानक परिस्थिती

दरवर्षी शहराकडे मिळेल ते मजुरीचे, हमालीचे काम करून मोठ्या मेहनतीने ते पैसे जमा करतात आणि पुन्हा जूनमध्ये ते आपल्या गावी परततात. मात्र, करोना सारखा महाभयंकर आजार पसरल्याने रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना उन्हाळ्यातील मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पुन्हा माघारी आपल्या घराकडे परत फिरावे लागत आहे. त्यामुळे आता आदिवासी स्थलांतरित कुटुंबांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीची गंभीर समस्या त्यांच्या पुढे उभी राहीली आहे. त्यातच फेब्रुवारी, मार्चपासूनच शहापूर तालुक्यात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील रहिवाशांना रोजगार आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागेल, अशी एकंदरीत भयानक परिस्थिती शहापूर तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

करोनाच्या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने सोडियम क्लोराईड पाण्यात मिसळून त्याद्वारे महापालिका रुग्णालय, मंडई तसेच महापालिका विभागीय कार्यालयांमध्ये फवारणी करत आहेत. त्यानुसार काही नगरसेवकांनी आपल्या विभागांमध्ये अशाप्रकारच्या फवारणी यंत्रांची खरेदी करत त्याद्वारे फवारणी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांचे नगरसेवक अशाप्रकारच्या माध्यमातून विभागांमध्ये जंतूनाशक फवारणी करत आहेत. मात्र, काँग्रेसचे मरोळ येथील प्रभाग क्रमांक ८२चे नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी यांनी आस्पो कंपनीची भारतीय बनावटीच्या मोठ्या फवारणी यंत्रांची खरेदी केली. हे यंत्र टेम्पोमध्ये ठेवून त्यातून फवारणीचे काम केले जाते. या फवारणीमधून रस्त्यांच्या प्रत्येक भागांमध्ये जंतूनाशक पसरले जातेच. शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत ही फवारणी होऊन प्रत्येक खिडक्यांच्या लोखंडी ग्रीलचेही निजंर्तुंकीकरण केले जाते. अशाप्रकारच्या फवारणी यंत्राचा वापर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे तशाच प्रकारच्या फवारणी यंत्र आपण घेऊन माझ्या प्रभागासह इतर प्रभागांमध्ये तसेच पर्यायाने के-पूर्व महापालिका विभाग कार्यालयाच्या संपूर्ण हद्दीमध्ये या यंत्राद्वारे फवारणी करण्यात येणार असल्याचे कुट्टी यांनी सांगितले. आतापर्यंत नगरसेवकांनी घेतलेल्या सर्व फवारणी यंत्रांच्या तुलनेत हे फवारणी यंत्र अत्याधुनिक पध्दतीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारनटाईनमधून तरुण पळाला, गुन्हा दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -