घरCORONA UPDATECoronavirus: यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करा -अजित पवार

Coronavirus: यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करा -अजित पवार

Subscribe

देशावरचा ‘करोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

राज्यात करोना दिवसागणीक वाढत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक स्पर्धा, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, करोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा लागणार आहे. नागरिकांनी यंदा ‘करोना’विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, ‘करोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे.


हेही वाचा – Coronavirus – करोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना दिलासा!

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये.  रस्त्यावर येऊ नये आणि गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, देशावरचा ‘करोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन… शोभायात्रांचे आयोजन करुन सामुहिक पद्धतीने करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील परंतु शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -