घरCORONA UPDATECoronavirus Crisis: कोरोनोमुळे आंबा व्यवसाय संकटात; १ हजार कोटींचा फटका

Coronavirus Crisis: कोरोनोमुळे आंबा व्यवसाय संकटात; १ हजार कोटींचा फटका

Subscribe

कोरोनोचे वाढते संकट रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आंबा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये होणाऱ्या आंबा व्यवसायाला यंदाच्या वर्षी सुमारे १ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली. आंबा व्यवसायाचा सर्वात मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना होणार असून कोकणातील शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने तात्काळ जाहीर करावे, असे देखील संजय पानसरे यांनी नमूद केले. अन्यथा, कोकणातील शेतकरी देशोधडीला लागेल, अशी चिंता पानसरे यांनी व्यक्त केली.

संपूर्ण जगाला आणि देशाला भयभीत करून सोडणाऱ्या कोरोनोमुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारने कोरोनोला हरविण्यासाठी संपूर्ण अत्यावश्यक यंत्रणा केंद्रित केली आहे. मात्र त्यामुळे निर्माण होत असलेल्या आर्थिक संकटाने कंबरडे मोडले आहे. कोरोनोमुळे संपूर्ण फळ व्यापार संकटात आला आहे. फळ व्यवसायावर मोठे संकट आले आहे. गेल्या वर्षी वाशीतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये ४० हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली होती. कोकणातील शेतकऱ्यांचा आंबा मोठ्या प्रमाणात एपीएमसीत येतो. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या हापूस आंब्याची नेहमीच राज्यात आणि देशात मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी आंब्याचे पीक उशिरा होते. मात्र मार्केटमध्ये आंबा येण्याच्या वेळीच नेमके कोरोनोचे संकट येऊन ठेपले आहे. याचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्याला बसणार आहे. कोरोनोच्या संकटामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. लॉकडाउन मध्ये कोकणातील शेतकरी आपल्या आंबा उत्पादनाची मार्केटिंग करू शकणार नाही. आंबा एपीएमसीत आणला तरी तो द्यायचा कोणाला हा देखील प्रश्न देखील लॉक डाउन काळात निर्माण झाला आहे.

- Advertisement -

कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यांना सावरण्याची गरज असून सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपयांचे पॅकेज तात्काळ जाहीर करावे आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संजय पानसरे यांनी केली. अन्यथा कोकणातील शेतकरी देशोधडीला लागेल आणि आयुष्यातून उठेल, अशी भीती संजय पानसरे यांनी व्यक्त केली. सध्या सरकार कोरोनोशी लढत आहे. मात्र किमान पॅकेज तरी जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, असेही ते म्हणाले.

द्राक्षांचे ७० टक्के पीक नष्ट झाले असून सुरवातीला आलेले द्राक्ष पीक उडाले. द्राक्षाच्या मधल्या पिकाने शेतकऱ्यांना हात दिला. मात्र त्यानंतर पुन्हा द्राक्षे पिकाला फटका बसला. संत्रे, द्राक्षे, कलींगड पिकावर देखील कोरोनोचा मोठा फटका बसला आहे, असे देखील पानसरे यांनी सांगितले.

Coronavirus Crisis: कोरोनोमुळे आंबा व्यवसाय संकटात; १ हजार कोटींचा फटका
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -