घरमहाराष्ट्रमुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल

मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल

Subscribe

पुणे शहर व परिसरात सोमवारी सकाळी 11.30 वाजेपासून पुढील दीड तास मुसळधार पाऊस पडला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले व अर्ध्या तासाने टपो-या थेंबांनी पावसाला सुरूवात झाली. पेठ, स्वारगेट, सिंहगड रोड, बिबवेवाडी, सहकारनगर, कोंढवा, सातारा रास्ता परिसर, शिवाजीनगर, टिळक रास्ता भागात पावसाचा जोर अधिक होता.

ऐन दिवाळीत आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अनेकांचे किल्ले, आकाश कंदील भिजल्याने नुकसान झाले. कोकणात निर्माण झालेल्या चक्राकार वार्‍यांमुळे पुण्यात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी पाऊस पडल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. पुढील 2-3 दिवस शहरात पावसाच्या काही सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांनी दुकानांच्या आसरा घेतला. तर काहींना भिजतच आपले कार्यालय गाठावे लागले. रस्ते निसरडे झाल्याने काही ठिकाणी दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडल्या. ऐन दिवाळीत पुणेकरांना पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -