CoronaVirus – कोरोना असूनही बळीराजानं कसली कंबर, ३१ ट्रॅक्टर्सची खरेदी!

शेती कामासाठी 31 ट्रॅक्टरची खरेदी

Mumbai

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यत लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर सर्वच उद्योगांना कमालीचा फटका बसला आहे. मात्र लॉक डाऊनच्या काळातही  राज्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामासाठी आवश्यक ट्रॅक्टरची जोरदार खरेदी सुरू आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या चार दिवसांत राज्यातील आरटीओंमध्ये एकूण ८७ वाहनांची नोंद झाली असून त्यात शेतीसाठीच्या ३१ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. राज्यातील बळीराजा शेती कामासाठी कामाला लागला यावरून दिसून येत आहे.

आधी कोरोना आणि नंतर लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य आहे. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद तसेच  रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे. तरीही  ग्रामणी भागात शेतकरी देशाला संकटातुन बाहेर काढण्यासाठी खरिप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असून पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा      मजूरांचा अभाव असुन मजूरीचे दर वाढल्याने आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने कामे उरकण्याकडे शेतक-यांचा अधिक कल दिसून येत आहे. राज्यभरात लॉक डाऊनची परिस्थिती असताना केंद्र शासनाने वाहन नोंदणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा घेत ग्रामीण भागात शेत मशागतीच्या कामासाठी आवश्यक ट्रॅक्टरची जोरदार खरेदी सुरू आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या चार दिवसांत राज्यातील आरटीओंमध्ये एकूण ८७ वाहनांची नोंद झाली असून त्यात शेतीसाठीच्या ३१ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे.

चार दिवसात ८७ वाहनांची नोंदणी

दैनिक आपलं महानगरला परिवहन विभागाने  दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात एप्रिल महिन्यात ८७ वाहनांची नोंद झाली आहे, त्यात भारत स्टेज-४ प्रकारातील ४० वाहनांचा समावेश आहे. तर भारत स्टेज-६ प्रकारातील १६ आणि भारत स्टेज ३ ए प्रकारातील ३१ वाहनांची नोंदणी झाली आहे. या गाड्यांमध्ये तब्बल ३१ ट्रॅक्टर्स आहेत. तर ४५ मोटारसायकल आणि स्कूटर्स,  ४ कार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४ तीनचाकी रिक्षा,  तसेच माल वाहतूक करणाऱ्या ३ तीनचाकी रिक्षांचीही या महिन्यात खरेदी-विक्रीची नोंद आहे.

२ कोटी ६६ लाख रुपयांचा महसूल 

राज्यभरात लॉक डाऊनची परिस्थिती असताना केंद्र शासनाने वाहन नोंदणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन नोंदणीसह नवे परमिट, परमिटचे नुतनीकरण, गाडीच्या नोंदणीचे नुतनीकरण आणि विविध कामांसाठी राज्यातील ५२ प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. चार दिवसात ८७ वाहनांची नोंद झाल्यामुळे परिवहन विभागाने तब्बल २ कोटी ६६ लाख ६३ हजार ७२८ रुपयांचा महसूलही कमावला