घरमहाराष्ट्रगुरूवारी मध्यरात्री दुरांतो एक्सप्रेसवर जळगावजवळ दरोडा

गुरूवारी मध्यरात्री दुरांतो एक्सप्रेसवर जळगावजवळ दरोडा

Subscribe

जळगाव जवळ दुरांतो एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला आहे. काही अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री उभ्या असलेल्या गाडीवर दरोडा टाकत. प्रवाशांचे दागिने आणि पैसे लंपास केले. याप्रकरणी इगतपूरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावजवळ दुरांतो एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला आहे. भुसावळ स्थानकावरुन निघाल्यानंतर माहेजी आणि मसावत दरम्यान गाडी थांबली असता दरोडा टाकण्यात आला. गुरुवारी मध्य रात्री अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. तीन ते चार दरोडेखोरांनी एका महिलेच्या गळ्यातले मंगळसुत्र आणि काही प्रवाशांचे पैसे घेऊन पळ काढला. याप्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवाशांचे दागिणे आणि पैसे लंपास

जळगाववरुन मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. नागपूरला राहणाऱ्या अनिता चिंचोलीया या गाडीने प्रवास करत होत्या. रात्री अडीचच्या दरम्यान ही गाडी थांबली असता काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम (३२,००० रुपयांचे) मंगळसुत्र जबरदस्तीने हिस्कावून पळून गेले. त्यानंतर या दरोडेखोरांनी दुसऱ्या बोगीमध्ये असणाऱ्या प्रवाशांचे देखील दागिणे आणि पैसे लंपास केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी अनिता चिंचोलीया यांनी इगतपुरी लोगमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच एक्सप्रेसमधील इतर प्रवासी देखील तक्रार करणार आहेत. सदरची घटना भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्यामुळे हे प्रकरण भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करणार असल्याचे इगतपुरी पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -