राज्याच्या निवडणूक खर्च निरीक्षकपदी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून निवृत्त सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे.

Maharashtra
election commission
निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून निवृत्त सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल, मंगळवारी महाराष्ट्र आणि तामीळनाडू राज्यातील लोकसभा निवडणूक काळात होणाऱ्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून अनुक्रमे शैलेंद्र हांडा आणि मधू महाजन या निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

कारवाईचे अधिकार हांडा यांच्याकडे 

शैलेंद्र हांडा यांना आयकर खात्याच्या तपास विभागात कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. निवडणूक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या कामांवर हांडा लक्ष ठेवणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवत मतदारांना रोख रक्कम, दारू वाटणाऱ्या तसेच इतर प्रलोभनं दाखविणाऱ्या व्यक्ती/संस्था यांच्याविरुद्ध ‘सी-व्हीजील’द्वारे आणि१९५० या मतदार हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या माहिती आणि तक्रारींच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे अधिकार शैलेंद्र हांडा यांच्याकडे असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here