इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट समाप्त

Mumbai
Eco friendly bappa contest
इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट - २०१९

इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेला याही वर्षी तुफान प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता भाविक आणखी जागृत होत आहेत. आता या स्पर्धेसाठी अर्ज घेणे आम्ही थांबवत आहोत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता व्होटिंगसुद्ध बंद करण्यात येईल. त्यानंतर सर्व अर्जांची छाननी करुन विजेता घोषित करण्यात येईल.


श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करतात. मात्र त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत ‘इको फ्रेंडली बाप्पा कॉन्टेस्ट’! या माध्यमातून तुम्हाला तुमची इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. चला तर मग, प्रबोधनाचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया! इको – फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.


कोण सहभागी होऊ शकतं?

– पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती

– प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट

– विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा

स्पर्धेसाठी अर्ज कसा करायचा?

– आमच्या 75066 50006 या व्हॉट्सअॅप नंबरवर किंवा [email protected] आयडीवर खालील माहिती पाठवा

– तुमचे पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवा

– बाप्पांच्या मूर्तीचा फोटो

– सजावट आणि देखाव्याचा फोटो

– गणपती किती दिवसांचा आहे?

– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे?

– किती वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहात?

– इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे का वाटले? किंवा त्यामागची प्रेरणा काय होती?

– जमल्यास सजावटीसोबत तुमचे १ मिनिटांचे मनोगत व्हिडिओ स्वरुपात पाठवले तर फारच छान.


ज्या बाप्पाला सर्वाधिक वोट, तो ठरणार विजेता!

– तुम्ही दिलेली माहिती आम्ही www.mymahanagar.com या वेबसाईटवर अपलोड करु

– त्यानंतर त्याची पोस्ट मायमहानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली जाईल.

– तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हालाही त्यात टॅग केले जाईल.

– तुमच्या माहितीची लिंक तुम्ही दिलेल्या संपर्कावर (व्हॉट्सअॅप किंवा ईमेलवर) पाठवली जाईल. या लिंकवर तुमच्या गणपतीसाठी वोटिंगचा पर्याय असेल.

– ज्यांच्या लिंकवर जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार बक्षिसे दिली जातील!

– पहिले पारितोषिक रोख रक्कम रुपये ५५५५/- द्वितीय रुपये ३३३३/- आणि तृतीय रुपये २२२२/- असेल.

– ज्यांना पोरितोषिक मिळेल त्यांची सविस्तर बातमी आपलं महानगर या दैनिकात छापून येईल. तसेच पुन्हा वेबसाईटवरही त्याची माहिती दिली जाईल.

eco friendly bappa contest


 

नियम व अटी –

– एका व्यक्तिला एकदाच वोटिंग करता येईल.

– कोणतेही तंत्रज्ञान वापरून पुन्हा पुन्हा वोटिंग केल्यास त्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.

– या स्पर्धेसाठी दिनांक २ ते १० सप्टेंबरपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.