घरताज्या घडामोडीप्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

Subscribe

१२ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अमित चांदोळेंना अटक केली.

मनी लॉड्रींग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्याचे सुपुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. याच प्रकरणी ईडीने पहिली अटक केली आहे. प्रताप सरनाईक यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्यात शक्यता आहे.

माहितीनुसार, टॉप्स ग्रुप या खासगी कंपनीचे अमित चांदोळे भागीदार आहेत. यामध्ये आर्थिक अनियमितत असल्यामुळे अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे अमित चांदोळे निकटवर्तीय असल्याचे समोर येत आहे. अमित चांदोळे यांना १२ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र पूर्वेश आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. त्यानंतर ईडीने विहंगची पाच तास चौकशी केली होती. छापा टाकला त्या दिवशी प्रताप सरनाईक परदेशात असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली नव्हती. त्यामुळे ईडीने समन्स बजावून प्रताप सरनाईक यांना बुधवारी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते. पण आपण क्वारंटाईन असल्यामुळे पुढील आठवड्यात आपली चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र प्रताप सरनाईक यांनी ईडीला पाठवले. सरनाईक यांच्या एका नातेवाईकाने हे पत्र स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन दिल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा –  ‘कोरोनाचं संकट दूर होऊ दे’; अजित पवारांचं विठुराया चरणी साकडं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -