Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शिक्षण व व्यवस्थापन तज्ज्ञ प्र.चि.शेजवलकर यांचे वृद्धपकाळाने निधन

शिक्षण व व्यवस्थापन तज्ज्ञ प्र.चि.शेजवलकर यांचे वृद्धपकाळाने निधन

पुण्यात त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते.

Related Story

- Advertisement -

वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण, साहित्या, अध्यात्म यासांरथख्या विषयाच पारंगत असलेले प्र. चि. शेजवलकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. पुण्यात त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्याची पत्नी, मुलगी आणि जावाई आहेत. डॉ शेजवलकर यांच्यामुळे पुण्यात बी कॉमचा अभ्यास मराठीतून शिकवला जातो. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकाही मराठी भाषेमधून लिहिता येते.

प्रभाकर चिंतामण शेजवलकर उर्फ प्र. चि. शेजवलकर हे व्यवस्थापन, लेखक तसेच शिक्षणचतज्ज्ञ होते. त्यांच्या मार्गदर्शनासाठी ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी पी एच डी मिळवली आहे. कॉमर्सचे शिक्षण मराठीतून मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. आज पुण्यात विद्यार्थी कॉमर्स हा विषय मराठीतूनही शिकू शकतात ते शेजवलकर यांच्यामुळे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे ते व्यवस्थापन शात्र विभागाचे प्रमुख होते. पुणे स्टॉक एक्सचेंजचेही ते व्यवस्थापक होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषजदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रमुख शरद पवार यांचे शेजवलकर हे शिक्षक होते. बी एम सी सी विद्यालयात शरद पवार शिकत असताना शेजवलकर हे त्यांचे शिक्षक होते. शरद पवारांना चे अनेकदा मोलाचे सल्ले देत असत.

- Advertisement -

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी शेजवलकर नेहमी आपल्या लेखनातून त्याचुप्रमाणे व्याख्यानातून नेहमी पाठपुरवठा करत होते. आतापर्यंत सुमारे ३० हजार पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली लिहिली. आठवणीतील माणसं, उद्योजकांची कर्तृत्वगाथा, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, नव्या युगाची स्पंदने, मधुपरिक्षा, महाराष्ट्राचा आर्थिक विकास यासांरखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.


हेही वाचा – लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलावा

- Advertisement -