घरमहाराष्ट्रअनिल देशमुख तेव्हा झोपला होतात का? विनोद तावडेंचा पलटवार

अनिल देशमुख तेव्हा झोपला होतात का? विनोद तावडेंचा पलटवार

Subscribe

सुरतमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण सुरत घटनेचा संबंध नगर विकास खात्याच्या परवानगीशी आहे. शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, हे पण माजी शिक्षणमंत्र्याला कळत नाही हे दुर्दैवी आहे, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिले.

कोचिंग क्लासचे मालक आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्याला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, अनिल देशमुख स्वत: शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झोपा काढत होते का? आता त्यांना जाग आली. केवळ सुरतमध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मृताचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारण करु पाहतेय हे दुर्दैवी आहे, अशी टिकाही तावडे यांनी केली.

- Advertisement -
हे वाचा – कोचिंग क्लास मालक आणि विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण – अनिल देशमुख

कोचिंग क्लासच्या मसुद्याबाबत तावडे यांनी स्पष्ट केले की, जो मसुदा तयार झाला त्यात सामान्य गृहीनी जी घरी शिकवणी घेते आणि जे गरीब विद्यार्थी शिकवण्या करुन आपले उच्च शिक्षण करतात ते भरडले गेले असते, म्हणून या मसुद्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात येत आहेत. क्लासवाल्यांकडून पैसे घेतले हे सिध्द करावे, असे खुले आव्हानही तावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला दिले.

गरीब विद्यार्थी जो शिकवण्या करुन शिक्षण घेतो आणि सामान्य महिला शिकवण्या घेऊन आपल्या कुटूंबाला घराला हातभार लावतात, त्यांनाच उध्वस्त करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आहे का? असा थेट सवालही तावडे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -