एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण!

एकनाथ खडसे

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळतेय. आत्तापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. आता त्यामध्ये एकनाथ खडसेंच्या देखील नावाचा समावेश झाला आहे. एकनाथ खडसे मुंबईत उपचार घेणार असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देखील मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच ते रुग्णालयात दाखल होणार आहेत. तसेच, माझ्या सान्निध्यात जे कुणी आले, त्यांनी देखील कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन खुद्द एकनाथ खडसे यांनी केलं आहे.