घरलोकसभा २०१९खडाजंगीएकनाथ शिंदेनी घेतलं आनंद परांजपेंचे नाव आणि सभागृहात हशा पिकला

एकनाथ शिंदेनी घेतलं आनंद परांजपेंचे नाव आणि सभागृहात हशा पिकला

Subscribe

कल्याण लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा डोंबिवलीत पार पडला. ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असल्याचे सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या ओघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचही नावं घेतल आणि मध्येच थांबले… त्यावेळीही आपण प्रचंड मेहनत घेतली, पण दुर्दैवाने… काय आता जाऊ द्या सोडा..” असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांसाठी युतीचे मेळावे सर्वत्रच होत आहेत. रविवारी डोंबिवलीत खासदार शिंदे यांच्या प्रचारार्थ मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, युतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने सर्वांच्याच भुवया उडाल्या. ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे. ज्या निवडणुका लढल्या त्या जिंकलो. आजपर्यंत आपण अनेक कठीण निवडणुका जिंकलो आहोत, असं म्हणत त्यांनी आजवर जिंकलेल्या उमेदवारांची नावं सांगायला सुरुवात केली.

- Advertisement -

हे वाचा – राष्ट्रवादीच्या नियोजन बैठकीत वरिष्ठांसमोरच कार्यकत्यांचा गोंधळ 

मात्र यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून आनंद परांजपे यांचंही नाव निघालं आणि एकनाथ शिंदे ‘जाऊदे’ असं म्हणून बोलता बोलता काही क्षण थांबले. पुढे ‘त्याचीही पोटनिवडणूक आपण पाहिली, तोही नवीन होता, आणि त्यावेळीही आपण प्रचंड मेहनत घेतली, पण दुर्दैवाने.. काय आता जाऊ द्या सोडा..” असं म्हणत ते पुन्हा थांबले, यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला. त्यावेळी कार्यकत्यांमधून तो तिकडे गेला… असा आवाज आला. तीच री ओढीत शिंदे यांनी “तो तिकडे गेला म्हणून श्रीकांत इकडे आला” असं म्हणत जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, अशी सारवासारव केली. प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमी लेखू नका आणि गाफिल राहू नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकत्यांना केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -