घरमहाराष्ट्रसर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी

सर्व्हर डाऊन; अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी केली मुदत वाढीची मागणी

Subscribe

महापालिकेच्या निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. या उमेदवाराने मुदत वाढीची मागणी केली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अडचणी येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या इंटरनेट ब्राउजरचा वापर करुनही ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना असंख्य समस्या उद्भवत असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. महापालिका निवडणुकींतर्गत उमदेवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र, १६ आणि १७ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाचे सर्व्हर बंद असल्याने उमेदवारी अर्ज अपलोड झालेले नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत असल्याने अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सर्व्हर सुरू करून उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस मुदतवाढ देण्यात यावी आणि अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्विकारण्याची सूचना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अद्याप मुदत वाढ नाही

ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या असंख्य अडचणी येत असल्याने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्ज भरताना निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच अर्ज रविवारी सायंकाळी वेबसाइट व्यवस्थित सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत असल्याने अद्याप मुदत वाढीबाबत कोणताही विचार केला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा –  सोशल मिडिया, निवडणुका आणि नवे व्हिजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -