घरमहाराष्ट्रपहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; निवडणूक कर्मचारी रवाना

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; निवडणूक कर्मचारी रवाना

Subscribe

निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त आणि अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिल २०१९ रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील ३५ मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

या ७ मतदारसंघात होणार मतदान

पहिल्या टप्प्यात राज्यातील ७ लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात १४ उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक मतदार संघातून १६, नागपूर मतदार संघातून ३०, भंडारा- गोंदिया मतदार संघातून १४, गडचिरोली- चिमूर मतदार संघातून ५, चंद्रपूर मतदार संघातून १३ आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघातून २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त आणि अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कारवाई करुन जप्त केलेला मुद्देमाल

राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत ९७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३० कोटी रुपयांची रोख रक्कम, १७ कोटी रुपयांची दारु, ४.६१ कोटी रुपयांचे मादक पदार्थ, ४४ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि इतर मौल्यवान जवाहिर यांचा समावेश आहे.

सी-व्हिजिल ॲपचा प्रभावी वापर

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत २ हजार ५२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी १ हजार ४९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप, पैशांचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -