घरमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा

Subscribe

१६ जुलैरोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला होणार आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

निवडणूक! निवडणूक!निवडणूक! एका निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो त्यापूर्वीच दुसरी निवडणुक जाहीर! पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होते न होते त्यापूर्वीच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी पाच नंतर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक संपत नाही तोच विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमी पाहायाला मिळणार आहे.शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर,काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, यांची मुदत असल्याने १६ जुलै रोजी मतदान होणार आहे.तर, त्याच संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी ५ जुलै ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर,६ जुलै रोजी अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ जुलैपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ५ नंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका झाल्यानंतर १५ दिवसांच्या अंतरानेच विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

- Advertisement -

पदवीधर मतदार संघात भाजप विरूद्ध शिवसेना

कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये प्रामुख्याने कोकण आणि मुंबई या दोन्ही पदवीधर मतदार संघामध्ये होणारी निवडणूक ही लक्षणीय असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -