घरमहाराष्ट्रएलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

Subscribe

विधानसभा निवडणूक असल्यामुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचे वेळापत्रक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रमा पाठोपाठ आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमुळे पुन्हा एकदा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा (शासकीय रेखा कला) पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रकला परीक्षेचे नव्या तारखांवेळीच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा होत असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे ही परीक्षा २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान घेण्याचा निर्णय कला संचालनालयाकडून घेण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेण्यात येणारी २०१९-२० या वर्षासाठीची दहावीची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १७ नोव्हेंबरला होणार आहे.

या परीक्षेला बसलेले विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेपासून वंचित राहू नये म्हणून पालक, परीक्षा केंद्र प्रमुखांनी तसेच कलाध्यापक संघटनांनी कला संचलनालयाकडे तारखांत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही परीक्षा २७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसंबंधीत सूचना आणि वेळापत्रक www.doa.org.in या कला संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

- Advertisement -

शालेय स्तरावर होणार्‍या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतला होता. राज्यभरातील सुमारे ११०० परीक्षा केंद्रांवर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा होणार होती. मात्र त्याचवेळी निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीच्या कामामध्ये राज्यातील तब्बल दीड हजार कला शिक्षक गुंतल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतला होता.


हेही वाचा HSC, SSC Exams : १०वी, १२च्या परीक्षांच्या तारखा जाहीर!

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -