घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाला स्थगितीमुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे अकरावी प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

Subscribe

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार असल्याचे समजते.

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत मंगळवारी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच शाळा सुरू करण्याबाबत संस्था चालकांबरोबर चर्चा झाली. मात्र, संस्था चालकांची अजूनही शाळा सुरू करण्याची मानसिकता नाही. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पालकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ही चर्चा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करतील.

- Advertisement -

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकार यासाठी जबाबदार असल्याचे विरोधकांनी म्हटले. तर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करू, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -