घरमहाराष्ट्रपोलीस कोठडीत मारहाण झाली, अरुण फरेराचा आरोप

पोलीस कोठडीत मारहाण झाली, अरुण फरेराचा आरोप

Subscribe

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात पाच जणांना अटक केली होती. यापैकी अटकेत असलेले आरोपी अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप मंगळवारी कोर्टासमोर जबाब देताना केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.

एल्गार परिषद प्रकरण : अरुण परेरा, गोन्साल्विसला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी अतिरीक्त न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांच्यासमोर परेरा यांनी आपले वकिल सिद्धर्थ पाटील यांच्यामार्फत कोर्टाला आपल्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ४ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान एसीपी शिवाजी पवार यांनी आपल्याला आठ ते दहा वेळा कानशिलात लगावल्या. एसीपी पवार हे एल्गार परिषद प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. अशा प्रकारे गंभीर मारहाण झाल्यानंतर उजव्या गालाला सूज आल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती परेरा यांनी दिली.

- Advertisement -

परेरा यांच्या वकिलांनी कोर्टात वैद्यकीय अहवाल सादर केला असून परेरा यांच्या जबाबाशी छेडछाड होऊ नये यासाठी हा रिपोर्ट जतन करावा, अशी विनंती केली. विशेष न्यायालयासमोर या विषयासंदर्भात परेरा यांनी आपला जबाब नोंदवण्याआधी पोलिसांच्यावतीने काम पाहणारे वकिल उज्ज्वला पवार यांनी काही दिवसांचा अवधी सत्र न्यायालयाकडे मागितला आहे. सत्र न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यासाठी पुणे पोलिसांना वेळ दिला आहे.

एल्गार परिषदेचा तपासासाठी पोलीस अधिकार्‍याची पूर्णवेळ नियुक्ती

आज अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांच्या पोलिस कोठडीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी या मागणीसाठी पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र चौकशीसाठी तीनही आरोपींचा पोलीस कोठडी मिळवण्याचा अधिकार पोलिसांनी शाबूत ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -