घरताज्या घडामोडीएल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी; ३० जानेवारीला परिषद होणार

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी; ३० जानेवारीला परिषद होणार

Subscribe

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी मिळाली असून येत्या ३० जानेवारीला ही परिषद होणार आहे.

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. यापूर्वी निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी एल्गार परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एल्गार परिषदेला नकार दिला होता. मात्र, आता पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवनगी दिली आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारी रोजी गणेश कला क्रिडा मंच येथे एल्गार परिषद होणार आहे.

यामुळे नाकारली होती परिषद

२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नकार देण्यात आला होता. मात्र, परवानगी मिळावी याकरता त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. तसेच एल्गार परिषदेला परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरुन एल्गार परिषद घेऊ. अन्यथा जेलबंद आंदोलन करु, असा इशारा बी.जी. कोळसे पाटील यांनी दिला होता.

- Advertisement -

३ वर्षांपूर्वी घेण्यात आली एल्गार परिषद

एल्गार परिषद यापूर्वी तीन वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०१७ मध्ये शनिवारवाड्यावर एल्गार परिषद घेण्यात आली होती. मात्र, ती पुढे वादग्रस्त ठरली. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या परिषदेचा संबंध पोलिसांनी कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी जोडला.


हेही वाचा – Live Update: मुंबईत आज शेतकऱ्यांचा मोर्चा


Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -