घरमहाराष्ट्रमतदानासाठी खासगी आस्थापनांमध्येही भरपगारी रजा

मतदानासाठी खासगी आस्थापनांमध्येही भरपगारी रजा

Subscribe

मतदानाच्या दिवशी आस्थापनांनी सवलतीस पात्र असलेल्या सवलत देणे बंधनकारक आहे.

मतदानाच्या दिवशी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल आदी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भरपगारी रजा देण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या सुटीसाठी वेतनातून कपात करण्यात येऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांनी सवलत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी २१ ऑक्टोबरला मतदान करावे, असे आवाहन राज्याचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारातून मतदानाच्या दिवशी कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवू शकतात. मतदानासाठी सवलत किंवा सुटी मिळत नसल्यास अशा कामगारांनी मतदान क्षेत्राचा तपशील, आस्थापनेचे पुर्ण नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक अशा तपशीलासह तक्रार प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महापालिका कार्यालय यांच्याकडे तक्रार करू शकतात. तसेच कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी २०, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणीही तक्रार नोंदवण्याची मुभा आहे. तसेच २६५७३७३३ आणि २६५७३८४४ या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -