घरमहाराष्ट्रपुण्यातील युवा इंजिनियरची कामगिरी; कमी किंमतीच्या व्हेंटिलेटर्सची हेणार निर्मिती

पुण्यातील युवा इंजिनियरची कामगिरी; कमी किंमतीच्या व्हेंटिलेटर्सची हेणार निर्मिती

Subscribe

नागरिकांना कमी किमतीमध्ये जर हे व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले तर त्यांचा जीव वाचण्यास होणार मदत

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशभरात कोरोनाचं हैदोस सुरू आहे. आज कोरोनाग्रस्तांची संख्या देशात १९०० वर पोहोचली असून सर्वाधिक कोरोना रुग्ण हे ३३९ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोना या व्हायरसला संपवण्यासाठी नेमके औषधं कोणत्याही लसीचा अद्याप शोध लागला नसला तरी कोरोना रूग्णांचा आकडा कसा रोकता येईल यासाठी विविध स्तरावर सगळ्यांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहे. असाच एक विशेष प्रयत्न पुण्यातील एका संस्थेकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी चांगले आणि कमी किमतीतील उपचार उपलब्ध व्हावे, याकरता नोक्का रोबोटिक प्रायवेट लिमिटेड संस्था पुढे सरसावली आहे. ५० हजारपेक्षा कमी किंमत असणाऱ्या व्हेंटिलेटर्सची निर्मिती नोक्का रोबोटिक प्रायवेट लिमिटेड संस्थेचे को-फाऊंडर निखिल कुरेले हे करत आहेत. ५० हजारपेक्षा कमी किंमत असणारे हे व्हेंटिलेटर्स सामान्य रुग्णांचे नक्कीच प्राण वाचवू शकतील, असे युवा इंजिनियर निखिल कुरेले यांनी वाटते.


अमेरिकेत प्रेतांचा खच; एका दिवसात १ हजार जणांचा मृत्यू


- Advertisement -

नोक्का रोबोटिक्स या संस्थेमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि एरोस्पेस इंजिनियर्स काम करतात. आजच्या घडील भारतात आवघे ४० हजारहून अधिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. मात्र देशभरासह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करता तसेच रूग्णांची संख्या बघता जास्तीत व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे नागरिकांना कमी किमतीमध्ये जर हे उपलब्ध झाले तर त्यांचा जीव वाचण्यास मोठी मदत होईल, असे संस्थेतील इंजिनियर्स वाटते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -