घरताज्या घडामोडीकरोनाच्या पार्श्वभूमिवर मंत्रालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

करोनाच्या पार्श्वभूमिवर मंत्रालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

Subscribe

या नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग हा मदत आणि पुनर्वसन, सामाजिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग यांच्याकडून उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्यात सध्या ‘करोना’चे संकट असून, करोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत ४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमिवर आता मंत्रालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसा शासन निर्णय देखील जाहीर झाला असून, मंत्रालयातील दालन क्रमांक ६०३ मध्ये हे नियंत्रण कक्ष असणार आहे. याच नियंत्रण कक्षातून बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य स्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाची जबाबदारी प्रधान सचिव भूषण गगराणी आणि अप्पर मुख्य सचिव राजीव जलोट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

म्हणून नियंत्रण कक्षाची स्थापना

सध्या महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून, पुढचे पंधरा दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तसेच आताच रुग्णांची संख्या ही ४९ वर पोहोचली असून, यावर पुढचे काही दिवस नजर ठेवता येईल यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परिस्थिती हाताळली जाणार आहे. दरम्यान, या नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग हा मदत आणि पुनर्वसन, सामाजिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग यांच्याकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. तर नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणाऱी संगणक सुविधा, प्रिंटर तसेच इतर साहित्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इराणमध्ये अडकलेला जामखेड तालुक्यातील यात्रेकरू भारतात परतला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -