घरमहाराष्ट्रयंदा बाप्पा कोणाक पावतलो?

यंदा बाप्पा कोणाक पावतलो?

Subscribe

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असून सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. जशी बाप्पाची लगबग तुमच्या आमच्या घरी सुरू आहे, तशीच काहीशी बाप्पाच्या आगमनाची लगबग राजकारण्यांच्याही घरी सुरू आहे. मात्र यंदा राजकाराण्यांच्या घरी येणाऱ्या बाप्पाकडे राजकारणी मनातल्या मनात काही तरी मागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय, सगळेच बाप्पाकडे मनातल्या मनात काही तरी मागत असतात. पण यंदा राजकारणी बाप्पाकडे जे मनातल्या मनात मागणार आहेत, ते त्यांना पाच वर्षांसाठी मिळणार आहे. अहो आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यातच गणपतीनंतर निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यामुळे कुणी पुन्हा आमचे सरकार येऊ दे रे महाराजा, तर कुणी आमची गेलेली सत्ता पुन्हा येऊ दे तर कुणी यंदा पुन्हा आमदार होऊ दे तर कुणी पुन्हा मंत्री होऊ दे रे महाराजा, अशीच मनोमन मागणी करणार हे मात्र नक्की. पण आता बाप्पा नेमको कोणाक पावतलो, ह्याचा उत्तर मात्र निवडणुकीच्या निकालानंतर मिळताला.

या राजकारण्यांच्या घरी येणार बाप्पा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी ११ वाजता बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर मंत्री विनोद तावडे यांच्या ‘सेवासदन’ या निवासस्थानी देखील बाप्पाचे आगमन होते. याचसोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या देखील शासकीय निवस्थानी बाप्पाचे आगमन होते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि नारायण राणे, मनोहर जोशी यांच्या घरीदेखील सध्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या देखील घरी बाप्पाचे आगमन होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -