घरमहाराष्ट्रकराड आणि नगरमध्ये मतदान यंत्रात बिघाड

कराड आणि नगरमध्ये मतदान यंत्रात बिघाड

Subscribe

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रणेत बिघाड झाला आहे.

कराड तालुक्यातील कालगाव येथे मतदान केंद्र क्रमांक १६३ वर मतदान मशीन मध्ये बिघाड झाल्याने सकाळी आठ पर्यंत मतदान थांबले होते. याठिकाणी मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत असून तीन मशीन बदलल्या तरीही मतदान यंत्रणा सुरळीत झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याच बरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यात नान्नज येथील मतदार केंद्रात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाले. हे यंत्र बदलण्याचे काम सुरु आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पयाचे मतदान होत आहे. देशात एकूण ११५ जागांवर हे मतदान होत असून यामध्ये महाराष्ट्रातील १४ जागांचा समावेश आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, तरिही कराड आणि नगर येथील मतदारसंघांमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाली. त्यामुळे लोकांची मोठी रांग मतदानासाठी उभी राहिली. मतदानासाठी आलेल्या लोकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -