घरमहाराष्ट्रईडीच्या नोटीशीमागे काही काळंबेरं असू शकेल - मनोहर जोशी

ईडीच्या नोटीशीमागे काही काळंबेरं असू शकेल – मनोहर जोशी

Subscribe

कोहिनूर मिल प्रकरणात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) मनसे प्रमुख राज ठाकरे आणि कोहिनूर ग्रुपचे उन्मेष जोशी यांना नोटीस बजावली आहे. उन्मेष जोशी यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर येत चौकशीला सामोरे गेले तर राज ठाकरे यांची २२ ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे. या प्रकरणावर उन्मेष जोशी यांची वडील, कोहिनूर समूहाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ते म्हणाले की, “अचानक ईडीची नोटीस येण्यामागे काहीतरी काळंबेरं असूही शकतं. याप्रकरणाची पूर्ण माहिती मिळेपर्यंत अधिक काही सांगता येणार नाही. व्यवसायात अशा गोष्टींना तोंड द्यावेच लागते”

हे वाचा – कोहिनूर मिल खरेदी प्रकरण नेमकं आहे तरी काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -