घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी खटला चालणार

देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याप्रकरणी खटला चालणार

Subscribe

२०१४ सालच्या निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपविण्या प्रकरणी त्यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे फडणवीस यांना एक मोठा धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. २०१४ सालच्या प्रतिज्ञा पत्रात गुन्हे लपविण्याचे प्रकरण फडणवीसांना चांगलेच भोवले आहे. सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला आहे. शपथ पत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालणार आहे. याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. याआधी त्यांनी स्वतः या प्रकरणात जामीन मिळावा, म्हणून नागपूरच्या कोर्टात हजेरी लावली होती.

१८ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने हा आदेश सुरक्षित ठेवला होता. आता तो न्यायालयाने दिला आहे. २०१४ सालच्या निवडणुकीदरम्यान माहिती लपविण्याचा गुन्हा केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका प्रलंबित होती. परंतु, त्यावर पुर्नविचार करणे गरजेचे नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात हजर राहून खरच त्यांनी प्रतिज्ञापत्रातील माहिती लपविली होती का? याचा खुलासा द्यावा लागणार आहे. यात ते दोषी ठरले तर सहा महिन्याची कैद किंवा दंड यापैकी कोणतीही शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्यामुळे नागपूर कनिष्ठ न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले होते. त्यानुसार सुनावणी झाल्यानतंर १५ हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला होता. जामिन मिळाल्यानतंर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, १९९५ ते १९९८ च्या दरम्यान झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यावर दोन खासगी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर त्या तक्रारी मागे घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख मी केला नव्हता. या प्रकरणी आज कनिष्ठ न्यायालयाने मला समन्स बजावले होते. मी हजर राहिलो. मला पीआर बाँड देऊन पुढची तारिख दिली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. सर्वच्या सर्व आंदोलनातील केस आहेत. या दोन केसचा उल्लेख करण्याचे कोणतेही कारण नव्हते.”

फडणवीस पुढे म्हणाले की, “निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने मी या केस लपविल्या असे कोणतेही कारण नाही. मी २०१४ आणि २०१९ साली अर्ध्याहून अधिक मते घेऊन जिंकलो आहे. मला अडचणीत आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? ते मला माहीत आहे. योग्य वेळी त्यांच्यावर बोलेल.” असेही त्यांना भाष्य केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -