Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भंडारा रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी 6 सदस्यांची समिती- राजेश टोपे

भंडारा रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी 6 सदस्यांची समिती- राजेश टोपे

पीडित कुटुंबियांना उद्याच दिली जाणार पाच लाखांची मदत

Related Story

- Advertisement -

भंडारा रुग्णालयातील आग दुर्घटनेप्रकरणात १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उद्याच्या उद्या ही मदत पोहोचवली जाईल. आमच्या सहवेदना कुटुंबीयांसोबत आहेत. मातांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती तयार केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आहेत. सहा लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या समितीच्या माध्यमातून दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

याची चौकशी डिटेलमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, शॉर्ट सर्किट कसं झालं याची सगळी माहिती घेतली जात आहे. निष्काळजीपणा यात झाला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटना यापुढे घडणार नाही यासाठी सगळे ऑडिट केलं जाणार आहे. आम्ही त्या परिवारांना भेटून सांत्वन देण्याचा प्रयत्न करू. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. या रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या मृत बालकांमध्ये ८ मुली आणि २ मुलांचा समावेश होता. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते.

 


हेही वाचा – खुशखबर! १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात

- Advertisement -

 

- Advertisement -