घरमहाराष्ट्रएक तासात 50 गुणांची परीक्षा

एक तासात 50 गुणांची परीक्षा

Subscribe

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उदय सामंत यांची माहिती

अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासाची व 100 गुणांऐवजी 50 गुणांची घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र, या परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देत लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी केल्या आहेत. परीक्षा पद्धती, वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावे अशाही सूचना त्यांनी विद्यापीठाला दिल्या.

परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला कळवावी अशा सूचना सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. अधिकाधिक भर तंत्रज्ञानावर देऊन परीक्षा घेण्यात यावी, असे स्पष्ट करताना त्यांनी परीक्षा या 100 गुणांऐवजी 50 गुणांच्या तर तीन तासांऐवजी एक तासाची असणार असल्याचे संकेत दिले. अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंच्या गठीत केलेल्या 10 जणांची समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

- Advertisement -

विद्यापीठांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कमीतकमी कालावधीत परीक्षा घेताना त्या ऑनलाईन, ऑनलाईन व ऑफलाईन किंवा पेन व पेपर यांचा वापर करून घरातूनच परीक्षा घ्यावी, दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा 11 सूचना अहवालामध्ये समितीकडून मांडण्यात आल्या होत्या. यावर विद्यापीठाची शिक्षण समिती आणि परीक्षा मंडळाची तातडीने बैठक घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील, यावर चर्चा करून त्याची माहिती 7 सप्टेंबरपर्यंत सरकारला देत परीक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावी, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देत लेखी परीक्षांसाठी एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय उपलब्ध करून देताना प्रात्याक्षिक परीक्षा स्कायपे सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचण असल्यास त्याची माहिती तातडीने सरकारला कळवावी, जेणेकरून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात यूजीसीला कळवून मुदतवाढ घेण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -