घरताज्या घडामोडीगॅस गिझरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट; महिलेचा मृत्यू

गॅस गिझरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट; महिलेचा मृत्यू

Subscribe

गॅस गिझरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याने 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेखा दिलीप रत्नपारखी असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी सकाळी सुरेखा रत्नपारखी घरातील बाथरुममध्ये गेल्या. त्यांनी गॅस गिझर सुरु करताच गिझरचा स्फोट झाला. त्यात त्या ६३ टक्के भाजल्या. स्फोट इतका भीषण होता की दरवाजा तुटला व स्लॅबचा काही भाग कोसळला. उपचारार्थ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि.२९) मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -