घरमहाराष्ट्रबारावीच्या फेरपरीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या फेरपरीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

Subscribe

बारावीची परीक्षा देणारे नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधारण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी ऑनलाई अर्ज भरण्यासाठी 3 ते 14 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी व मुदत वाढवून देण्याबाबत विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार या परीक्षेला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. 3 ते 14 जूनपर्यंत विद्यार्थ्यांन जुलै-ऑगस्ट परीक्षेसाठी ऑनलाई अर्ज करायचे होते. या मुदतीत राज्य मंडळाकडून वाढ करून ती 24 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

15 ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह विलंब शुल्क भरण्यासाठी 29 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली असली तरी त्यानंतर विलंब शुल्काने अर्ज भरण्याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -