घरमहाराष्ट्रआषाढी यात्रेसाठी ३,७८१ जादा बसगाड्या

आषाढी यात्रेसाठी ३,७८१ जादा बसगाड्या

Subscribe

आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंळामार्फत ३ हजार ७८१ जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे, एस.टी. प्रांतधिकारी सचिन ढोले, सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक आर.आर. पाटील, महाव्यवस्थापक यांत्रिकी पावणीकर, उपमहाव्यस्थापक वाहुकचे तोरो, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, श्रीमती अर्चना गायकवाड, आजरे, विभाग नियंत्रक-रमाकांत गायकवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

आषाढी यात्रेच्या दिवशी चंद्रभागा बसस्थानकावरुन गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी पोलीस विभागाने एस.टी बसेससाठी राखीव वेळ ठेवावी. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही. त्यामुळे भाविकांना इच्छितस्थळी पोहचता येईल, अशा सूचना परिवहन मंत्री रावते यांनी या बैठकीत दिल्या. तसेच भंडीशेगांव येथील बाजीराव विहिर येथे शनिवार, २१ जुलै रोजी होणाऱ्या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी व येण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक येथून १०० जादा बसेसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच यात्रेनंतर परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भाविकांना परतीच्या प्रवासासाठी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षण करावे. तसेच पंढरपूर येथील मठ, यात्री निवास, धर्मशाळा आदी ठिकाणी वारकरी व भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत अशा ठिकाणी महामंडळाचे कर्मचारी जाऊन प्रवाशांच्या मागणी नुसार आगाऊ आरक्षण करुन देण्यात येणार असून, या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. तत्पूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पूरत्या उभारण्यात येणाऱ्या भिमा बसस्थानक, चंद्रभागा बसस्थानक तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बस स्थानकांची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून आवश्यक सूचना केल्या. तसेच परिवहन रावते यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन एस.टी. बसस्थानकाची पाहणी करुन प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पानसर तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

भाविकांसाठी सोयीसुविधा पुरवणार

यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलताना म्हणाले, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणत भाविक येत असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी २१ ते २८जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे ८ हजार कर्मचारी सेवा देणार असून, या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बस स्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उद्घोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -