शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक!

Pimpari-chinchwad

पिंपरी विधानसभेचे शिवसेना उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. अगोदर फेसबुवरील मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाला त्यानंतर मात्र अकाउंटच डिलीट झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे, याचा तपास लागण महत्वाचे आहे. या घटनेप्रकरणी स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये तक्रार दिली आहे. घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

फेसबुक अकाउंट हॅक करणाऱ्याचा शोध सुरू

महायुतीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट हॅक झाल्याले खळबळ उडाली आहे. अद्याप हे अकाउंट कोणी हॅक केलं हे समजू शकलेले नाही. सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. चाबुकस्वार यांच्या फेसबुक अकाउंटवर अनेक मित्र मतदार जोडले गेले होते. त्यामधून मतदारसंघातील कामे त्यांच्यापर्यंत पोहोचत असत. मात्र, अचानक मंगळवारी त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले. मोबाईल क्रमांक, मेल आयडी त्यानंतर चक्क फेसबुक अकाउंट डिलीट करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे कोण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने या मागचा सूत्रधार कोण आहे. याचा शोध सायबर क्राईम पोलीस घेत आहेत.

हेही वाचा –

आज राज ठाकरे यांच्या भाषणात ‘हे’ मुद्दे असण्याची शक्यता