घरमहाराष्ट्रमतदान करताना पठ्ठ्याने केलं चक्क फेसबुक लाइव्ह; गुन्हा दाखल

मतदान करताना पठ्ठ्याने केलं चक्क फेसबुक लाइव्ह; गुन्हा दाखल

Subscribe

मतदानाचे आवाहन करत असताना त्याने 'दादा तुमचा विजय निश्चित', 'दादा तुम्हीच' असा उल्लेख करत फेसबुक लाईव्ह केले आहे.

महाराष्ट्रामध्ये १० मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक २०१९ ची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या भारताच्या निवडणुकीत अनेक घटना घडताना दिसत आहेत. काही भागात नवं दामप्त्य मतदान करण्यास गेले तर काही दिव्यांग व्यक्तींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसले. आज अकोल्यामध्ये एका मतदाराने मतदारयंत्र फोडले तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या तरूणाने चक्क फेसबूक लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद येथे घडला आहे.

मतदानाची गोपनीयता भंग

मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचा फोटो, व्हिडिओ शेअर केल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची गोपनीयता पाळली जावी म्हणून मतदानयंत्र एका बंद खोलीत ठेवलेले असते आणि मतदानाची प्रकिया पार पाडली जाते. परंतु असा नियम असताना ही राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मतदान करताना फेसबूक लाइव्ह केले आहे. तसेच राष्ट्रवादीलाच मतदान करण्याचे आवाहन ही त्याने यामध्ये आहे. हे आवाहन करत असताना त्याने ‘दादा तुमचा विजय निश्चित’, ‘दादा तुम्हीच’ असा उल्लेख केला आहे. तर ‘माझं मत सिंहाच्या छाव्याला’ असे म्हणत या पठ्याने चक्क फेसबूक लाईव्ह केले आहे.

- Advertisement -

सायबर क्राइमचा गुन्हा दाखल

या तरुणाचा हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला फेसबुक लाइव्ह केलेला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. या प्रकरणात त्याच्या सोबतच्या चार जणांविरोधात सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -