घरमहाराष्ट्रआरोग्य विभागाचा गलथान कारभार

आरोग्य विभागाचा गलथान कारभार

Subscribe

पोलादपुरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद

हम दो, हमारे दो, असा नारा देत सुरू झालेली कुटुंब नियोजन मोहीम आता राष्ट्रीय चळवळ झालेली असताना, तसेच पुरुष, महिला त्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येत असताना येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात चक्क सहा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होत नाहीत. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारामुळे शस्त्रक्रिया करून घेऊ इच्छिणार्‍यांना २० किलोमीटर अंतरावरील महाड गाठावे लागत आहे.

शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा महामार्गालगत हे रुग्णालय आहे. पोलादपूर हा दुर्गम तालुका असून, तालुक्यासाठी असलेल्या या एकमेव मोठ्या रुग्णालयात दुर्गम, डोंगराळ भागातून रुग्ण उपचाराकरिता येत असतात. प्रामुख्याने रुग्णालयात प्रसुतीसाठी अशा भागांतून येणार्‍या गरोदर महिलांची संख्या लक्षणीय असते. प्रसुतीनंतर महिलेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून ध्यायची असेल तर तिला महाड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे स्वभाविक बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण गेल्या ६ महिन्यांपासून रोडावले आहे.

- Advertisement -

पळचिल, महालगूर, ओंबळी, कुडपण, मोरगिरी, कामथे, बोरघर, खांडज, ढवळे, उमरठ, देवळे, दाभिळ, किणेश्वर, आडावळे, बोरावळे ही दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गावचे रुग्ण प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे गावे आणि वाड्या, वस्त्या शहरापासून 10 ते 27 किलोमीटर अंतरावर आहेत. तेथून प्रसृतीसाठी या ग्रामीण रुग्णालयात येते तेव्हा तेथे रुग्णाला जेवण देण्याची सुविधा नाही. परिणामी तिला आणि सोबत असलेल्यांना आसपासच्या खाणावळींचा आधार घ्यावा लागतो. या महिलेला प्रसृतीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महाड येथे पाठविण्यात येते तेव्हा रुग्ण आणि सोबत असलेल्यांच्या हालाला पारावर उरत नाही. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपदी महिला असून, त्या स्त्री रोगतज्ज्ञ आहेत. तसेच रुगणालयात शस्त्रक्रिया कक्षही अद्ययावत आणि सुसज्ज आहे. मात्र दुर्लक्षामुळे रुग्णालय असून नसल्यासारखे झाले आहे.

या रुग्णालयात ओपीडीमध्ये दर दिवशी १००ते १५० रुग्ण उपचाराकरिता येत असतात. तसेच आंतररुग्ण विभागातही रुग्ण दाखल आहेत. दोन्ही विभागाचा भार वैद्यकीय अधीक्षकांसह एका आयुष डॉक्टरवर आहे. वास्ताविक वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ ची 3 पदे रिक्त आहेत. तर आयुष डॉक्टर पदे मंजूर असून, त्यापैकी एक आयुर्वेदिक डॉक्टरचे पद रिक्त आहे.

- Advertisement -

यापूर्वी आपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि आणीबाणीप्रसंगी सिझेरिअन शस्त्रक्रिया केल्या आहेत. येथे भूलतज्ज्ञ नाही. त्याची नियुक्ती केल्यास पूर्ववत शस्त्रक्रिया सुरू करता येतील
-डॉ. भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -