घरमहाराष्ट्रनाशिककुख्यात ताहीर डॉन गुजरातमध्ये जेरबंद; मोक्कांतर्गत कारवाई

कुख्यात ताहीर डॉन गुजरातमध्ये जेरबंद; मोक्कांतर्गत कारवाई

Subscribe

३७ गुन्ह्यांची उकल

दरोडा, घरफोडी, खंडणी, चोरीसह खूनाचा प्रयत्न करणारा आणि दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात ३० वर्षीय गुंड ताहीर जमाल शहीद जमाल ऊर्फ ताहीर डॉन याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली. तर, दोन साथीदारांना पोलिसांनी सुरत येथून अटक केली. त्यांच्याकडून ६४४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ताहीर डॉनवर मालेगावात ३७ गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

दोन वर्षांपासून होता फरार

ताहीर डॉन पोलीस दप्तरी दोन वर्षांपासून फरार असला तरीही, त्याने साथीदारांच्या मदतीने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मालेगावातील सराफी दुकानात दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली होती. तेव्हापासून तो फरार होता. या गुन्ह्यात तो मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. साथीदारांना सोबत घेवून त्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनीही पोलिसांना सहकार्य केले नाही. त्याचा ठावठिकाणा सापडत नसल्याने पोलिसांना तपासात अडथळा येत होता. २१ मे २०१८ रोजी उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग, मालेगाव यांनी ताहीर डॉनला एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, तो दोन वर्षांपासून फरार असल्याने पोलिसांना त्याला अटक करता येत नव्हती.

साथीदारांवर दाखल होणार मोक्का

ताहीर डॉनसोबत गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणार्‍या १० साथीदारांना पोलिसांना आधीच अटक केली आहे. त्यांनीसुद्धा दोनपेक्षा अधिक गुन्हे केले असल्याने त्यांच्यावरही मोक्कान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे. – डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक

- Advertisement -

दरम्यान, ताहीर अहमदाबाद (गुजरात) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अहमदाबाद येथून ताहीर डॉनला, तर २१ वर्षीय अमीन शहा अरमान शहा ऊर्फ अम्मू , २४ वर्षीय शेख आतीक शेख आमीन यांना सूरत येथून अटक केली. तिघांनी पोलिसांनी छावणी पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली.

सतत बदलायचा ताहीर डॉन मोबाईल-सीम

ताहीर डॉन चतुर असल्याने गुन्हा केल्यानंतर लगेच परराज्यात निघून जात होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. तो सातत्याने मोबाईल फोनसह नंबरही बदलत असे. त्यामुळे त्याचा मागोवा घेताना पोलिसांना अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे स्वतःची माहिती तो कधीही कुटुंबिय व साथीदारांना सांगत नव्हता.

- Advertisement -

प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे

मालेगाव शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ताहीर डॉनविरुद्ध दरोडा, घरफोडी, खंडणी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मालेगावातील आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, आझादनगर, किल्ला, कॅम्प, मालेगाव शहर व छावणी पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खंडणी व खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर स्वरुपाचे ३७ गुन्हे दाखल आहेत.


ग्राहकाच्या तक्रारीवरून बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना कोर्टाने ठोठावला दंड!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -