पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुली करणार अन्नत्याग आंदोलन

बळीराजानं शेतकरी संपाची हाक दिलेल्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांच्या मुलींनी आता आंदोलनात उडी घेतली आहे. ४ फेब्रुवारीपासून येथील बळीराजाच्या मुली अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

Maharashtra
puntamba farmer
पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे आंदोलन

शेतकरी आंदोलनाची सुरुवात झालेल्या पुणतांब्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला जाणार आहे. बळीराजानं शेतकरी संपाची हाक दिलेल्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांच्या मुलींनी आता आंदोलनात उडी घेतली आहे. सोमवार, ४ फेब्रुवारीपासून येथील बळीराजाच्या मुली अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सध्या पुणतांबा गावातून ‘देता की जाता?’, असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर यात्रा सुरू आहे. त्याचवेळी पुणतांबा गावातील बळीराजाच्या लेकी आता आक्रमक झाल्या आहेत. आपल्या हक्कांसाठी त्या अन्नत्याग आंदोलनाची मशाल पेटवणार आहेत. दीड वर्षापूर्वी याच पुणतांबा गावातून शेतकरी संपाची हाक दिली गेली होती. त्यानंतर राज्यभर त्याला प्रतिसाद मिळाला होता. सरकारचे लक्ष पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाने वेधले होते.

वाचा – अण्णा हजारेंचे उपोषण मागे!

विविध मागण्यांसाठी उपोषण 

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय यात्रा काढली जात आहे. सातबारा कोरा करा, शेत मालाला दीड पट हमीभाव द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या, अशा प्रमुख मागण्या बळीराजाच्या लेकींनी केल्या आहेत. किसान क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकिता जाधव या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. ‘सरकार जर, आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर, आमची शेती सरकारने करावी आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगाराचा पगार द्यावा’, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या मुलींनी केली आहे.

वाचा – पद्म पुरस्कार परत करण्याची अण्णांची तंबी; राज ठाकरे उद्या भेट घेणार

अण्णा हजारेंचेही उपोषण सुरु 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील लोकपालच्या नियुक्तीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून येत्या ८ किंवा ९ फेब्रुवारी पर्यंत जर निर्णय घेतला नाही तर माझा पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा इशाराच अण्णा हजारे यांनी दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून अण्णांच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी केली असताना मनसेप्रमुख राज ठाकरे सोमवारी प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

वाचा – लोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा बसणार उपोषणाला