घरमहाराष्ट्रबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Subscribe

नाशिकमध्ये शेतीचे काम करत असताना बिबट्ट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पाणी देत असताना बेसावध असलेल्या शेतकऱ्यावर बिट्ट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रामदास दळवी हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या शेतकऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

नाशिकमधील विंचुरी परिसरात बिबट्ट्याची दहशत असल्याचे दिसून आले आहे. विंचुरी परिसरात रामदास दळवी आणि त्यांचा भाऊ विजय दळवी मेढे मळ्यात शेतीचे काम करत होते. ते शेतात पिकाला पाणी देत असताना. अचानक त्या ठिकाणी बिबट्ट्या आला. त्याला पाहून दोन्ही भावांनी आरडाओरड केली. मात्र बिबट्ट्याने रामदास दळवी या शेतकऱ्याच्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यात रामदास दळवी शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बिबट्ट्याच्या तावडीतून सोडवून सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची दहशत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -