अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ५.२५ हजार कोटींचं नुकसान

पावसानं दगा दिल्यानं बळीराजापुढं आता आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. शेतकऱ्यांच्या एकूण नुकसानीचा आकडा हा ७.५० हजार कोटींवर जाण्याची भीती आता वर्तवली जात आहे.

Mumbai
Farmer of india

वरूण राजानं ओढ दिल्यानं आता बळीराजा संकटात सापडला आहे. पिकं तर वाळली पण बळीराजापुढं आता आर्थिक संकट देखील उभं ठाकलं आहे. पाऊस गायब झाल्यानं राज्यातील ८५ लाखांहून अधिक शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या एकूण नुकसानीचा आकडा हा ७.५० हजार कोटींवर जाण्याची भीती आता वर्तवली जात आहे. याची सर्वाधिक झळ बसली आहे ती मराठवाड्याला. आर्थिक नुकसानीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याचे सर्वाधिक म्हणजेच तब्बल सव्वापाच हजार कोटींचं होणार असल्याची भीती राज्य कृषी आयुक्तलयाने राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यात परतीच्या पावसानं देखील दगा दिल्यानं रब्बी हंगामाचं पिक देखील धोक्यात आलं आहे. पेरा झालेल्या पिकांची देखील अवस्था बिकट आहे. जून, जुलै आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत पाऊस पडला. मात्र तो देखील सरासरीपेक्षा कमी होता. त्यानंतर मात्र गायब झालेल्या पावसानं परतीच्या वेळी देखील दगा दिला. सप्टेंबर महिन्यामध्ये तर पावसाचं दर्शनच दुर्लभ झालं. सोयाबीन, तुरीचं पिक आलंच नाही. कापसाची बोंडं वाढलीच नाहीत. त्यामुळे उत्पादन क्षमतेवर देखील मोठा परिणाम झाला. फळबागांना देखील त्याचा मोठा फटका बसला. त्याचा सर्वाधिक फटका बसला तो मराठवाड्याला. शिवाय, बळीराजा आर्थिक गर्तेत देखील सापडला आहे.

वाचा – राज्यात रब्बीची केवळ १७ टक्के पेरणी!!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here