घरमहाराष्ट्रअजब! किटकनाशक म्हणून शेतात गावठी दारुचा शिडकाव

अजब! किटकनाशक म्हणून शेतात गावठी दारुचा शिडकाव

Subscribe

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर किटनाशक म्हणून गावठी दारुचा शिडकाव करत आहेत. या गावठी दारुचा सध्या पिकांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. शिवाय, या दारुचा पिकांना फायदाच होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

शेतकरी काबाडकष्ट करुन शेतात बि-बियाणं पेरतात. परंतु, या बि-बियांणांच रोपटं झाल्यावर या रोपट्यांवर किडे पडतात. ते संपूर्ण पिकांची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. अखेर या नुकसानीवर गोंदिया जिल्ह्याच्या चारगांव गावातील शेतकऱ्यांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. शेतातील पिकांचं किड्यांपासून रक्षण व्हावं, यासाठी या गावातील शेतकरी पिकांवर आता गावठी दारुचा शिडकाव करत आहेत. किटकनाशकांऐवजी दारुचा शिडकाव स्वस्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका हिंदी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील चारगांव गावातील शेतकरी हे पिकांना लागणाऱ्या किटकांपासून हैराण झाले होते. या गावातील शेतकरी हे भातशेती करतात. त्यांना माहित पडलं की, मध्य प्रदेशमध्ये भातशेती करणारे शेतकरी किटकनाशकं म्हणून गावठी दारुचा अवलंब करत आहेत आणि यामुळे त्यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे चारगांवच्या शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीमध्ये दारुचा शिडकाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६ लीटर पाणीमध्ये ९० एमएल गावठी दारुचे मिश्रण करुन त्याचा शिडकाव पिकांवर केला गेला. यामुळे पिकांना कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्यामुळे यावर्षीदेखील शेतकऱ्यांनी पिकांवर दारुचा शिडकाव करण्याचा निर्णय घेतला. साधारणत: ५० शेतकरी आपापल्या शेतामध्ये गावठी दारुचा शिडकाव करत आहेत. हे शेतकरी जवळजवळ २००० हेक्टर जमिनीचे मालक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक विषबाधा प्रकरण : प्रसादात १५ किटकनाशकाच्या बॉटल मिसळल्या

कृषीतज्ज्ञ काय म्हणत आहेत?

पिकांवर दारु शिंपडण्याची बातमी हवेसारखी देशभर पसरत आहे. दरम्यान, या संदर्भात कृषीतज्ज्ञांनी सांगितलं आहे कि, ‘शेतकरी पिकांवर दारुचा शिडकाव जरी करत असले तरी त्याचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे किटकांव्यतरिक्त पिकांवर याचा परिनाम होईल’, असे त्यांना वाटत नाही. शिवाय, ‘शेतकऱ्यांनी गावठी दारुच्या ऐवजी कडुलिंबाचा रसही शिंपडला तर त्याचा फायदा होऊ शकतो’, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -