घरमहाराष्ट्रराज्यातील १९ विद्यापीठांना एफडीएने दिली मुदत!

राज्यातील १९ विद्यापीठांना एफडीएने दिली मुदत!

Subscribe

विद्यार्थ्यांना चांगलं आणि पौष्टिक जेवण मिळावं या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने राज्यातील १९ विद्यापिठांच्या कुलगुरुंना बजावलं आहे की, 'कॅन्टीनवाल्यांना योग्य पद्धतीने जेवणं बनवावं आणि कॅन्टीनची साफ-सफाईही योग्य पद्धतीने करावी.'

अनेकदा विद्यापिठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कॅन्टीनच्या जेवणाबाबतच्या तक्रारी असतात. जेवण चांगलं नाही किंवा खूपच अस्वच्छ जागेत जेवण बनवलं जातं. विद्यार्थ्यांना चांगलं आणि पौष्टिक जेवण मिळावं या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने राज्यातील १९ विद्यापिठांच्या कुलगुरुंना बजावलं आहे की, ‘कॅन्टीनवाल्यांना योग्य पद्धतीने जेवणं बनवावं आणि कॅन्टीनची साफ-सफाईही योग्य पद्धतीने करावी.’ त्यासोबतच एफडीएच्या सर्व नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

‘एफडीएच्या नियमांचं सर्वच कॅन्टीनद्वारे पालन होत नाही’

मुंबईतील अनेक विद्यापिठांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे कॅन्टीनची जबाबदारी आहे की, कॅन्टीनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात तयार केलेलं जेवण द्यावं. याविषयी एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एफडीएच्या नियमांचं सर्वच कॅन्टीनद्वारे पालन होत नाही.

कॅन्टीनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं आणि पोषक आहार मिळावा, कॅन्टीनची साफ-सफाई करावी आणि अन्य नियमांचं योग्य पद्धतीने पालन व्हावं, यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठांच्या कुलगुरुंना पत्र लिहिलं आहे. शिवाय, कुलगुरुंना अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांना स्वच्छतेबाबत माहिती देत आहेत. सर्व कॅन्टीन्सला ३ ते ४ महिन्यांची मुदत दिली गेली आहे की त्यांनी एफडीएच्या नियमांचं पालन करावं आणि त्यानुसार, पत्र लिहून त्याचं उत्तर पाठवावं. असं नाही झालं तर कॅन्टीनची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल.
– पल्लवी दराडे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त
- Advertisement -

विद्यापिठांच्या कॅन्टीनमध्ये स्वच्छता असणं हे महत्त्वाचं असून बंधनकारक आहे. त्यामुळे, त्यांना ५८ नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना ३ ते ४ महिन्यांची मुदत देखील दिली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -