ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीची भिती

मोबाईल नसल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन ते शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती होण्याची भिती भाजप शिक्षक आघाडीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोन विकत घेऊ शकत नसल्याने राज्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोबाईल नसल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन ते शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती होण्याची भिती भाजप शिक्षक आघाडीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोकण व अमरावती जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी, गरीब व मोलमजुरी करणार्‍या कुटुंबातील आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र महागडे स्मार्टफोन, लॅपटॉप घेण्याची कुवत नसल्याने याचा फायदा केवळ ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांना होत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक कुवत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण घेण्याची कुवत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षणाची कोणतीही व्यवस्था सरकारने केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मोबाईल नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. परिणामी भविष्यात मोठ्या प्रमाणात शिक्षणातून विद्यार्थ्यांची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने ठोस पावले उचलून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याची व्यवस्था करायला हवी. विद्यार्थ्यांना कृती पुस्तिका, स्वाध्याय पुस्तिका पुरवाव्यात. टीव्ही व दूरदर्शनवर शिक्षणाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे संयोजन अनिल बोरनारे यांनी केली.