Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा!

देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा!

Related Story

- Advertisement -

 पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. नुकतेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

फडणवीस आणि अजितदादा यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त दोघेही एकत्र आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रम सुरु असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. भाजपकडून जय श्रीरामची घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर राष्ट्रवादीने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन जोरदार वाद सुरु आहे. याच वादावरुन हे कार्यकर्ते भिडले असावे, असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याची काहीही माहिती समोर आलेली नाही. यानंतर प्रसारमाध्यमांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, असे सांगितले. याच कार्यक्रमादरम्यान अजित दादांसोबत कार्यक्रम असला की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस भरपूर बातम्या होतात, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

कार्यक्रमात अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो, असे फडणवीस म्हणाले आणि कार्यक्रमात हशा पिकला. अजितदादा, मला असं वाटतं की जर दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या.

- Advertisement -