घरमहाराष्ट्रभंडाऱ्यात फुके, पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भंडाऱ्यात फुके, पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Subscribe

या हाणामारीत परिणय फुके यांचे बंधू नितीन फुके आणि नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले हे गंभीर जखमी झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात काल उशीरा रात्री भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी भाजपचे उमेदवार परिणय फुके आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना जबर जखमी होईपर्यंत झोडपले. या हाणामारीत परिणय फुके यांचे बंधू नितीन फुके आणि नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली. या घटनेनंतर साकोली मतदारसंघात तणावाचं वातावरण आहे.

पटोले यांच्या विरोधात गुन्हे दाखल

नितीन फुके हे काल म्हणजेच शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात होते. त्यावेळी नाना पटोले यांचे पुतण्या आणि काही समर्थकांनी नितीन फुके यांना वाहनात कोंबून पटोलेंच्या कार्यालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीत नितीन फुके गंभीर जखमी झाले. त्यांना साकोली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रात्री पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आक्षेप नाना पटोले यांच्या समर्थकांनी घेतला. या प्रकरणाची पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार तेव्हा परिणय फुके समर्थक पोलीस स्थानकात पोहोचले. त्यांनी नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र यांना बेदम मारहाण केल्याने ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी साकोली पोलीस स्थानकात पटोले यांच्याविरोधात अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -