युवतींकडून युवकाला सिनेस्टाईल मारहाण

Wife beating husband

सिडको : एखाद्या सिनेमात 4 ते 5 युवती एकत्र येतात आणि एका युवकाला भररस्त्यात खाली पाडून हातातील काठ्यांनी चोपतात, असाच प्रकार आज (दि.4) रात्री सिडकोतील रस्त्यावर नागरिकांनी बघितला.

उत्तमनगर येथे युवक व युवतींमधील वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. युवतींनी युवकाला मारायला थेट काठ्याच आणल्या. त्याला खाली पाडून काठ्या व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात त्याचे कपडे फाडले. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाली होती. यामुळे सोशल डिस्टनिंगचे तीन तेरा वाजले. घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीस उशिरा आले. विशेष म्हणजे, काहीही कारवाई न करता निघून गेले. पोलिसांचा धाक नसल्याने भररस्त्यावर असा प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारी कमी होत असल्याचे सांगत असताना दुसरीकडे भररस्त्यावर मारहाणीची घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणेला आव्हानच असल्याची चर्चा सुरू आहे.