घरमहाराष्ट्रअखेर फोन आले; मंत्री होणार दानवे-आठवले!

अखेर फोन आले; मंत्री होणार दानवे-आठवले!

Subscribe

अमित शहांनी दिले मंत्रिपदाचे निमंत्रण

एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण ६५ मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रीमंडळात २० नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळातील मंत्रीपदाकरिता रामदास आठवले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच २०१४ साली मंत्री होऊन नंतर राज्यात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेले रावसाहेब दानवे हे देखील यावेळी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. रामदास आठवलेंनी नरेंद्र मोदींना बहूमत मिळावे यासाठी संपुर्ण देशभरातील दलित मतदारांना भाजपाकडे वळवले होते. या कारणाने मोदी माझ्या नावाचा विचार मंत्री पदासाठी करुन अमित शहाच्या फोनची वाट पाहत होते. यामुळे मलाही देशाची सेवा करण्याची संधी मिळेल, असे काहीसे नाराजीचे वक्तव्य केले होते.

- Advertisement -

अखेर रामदास आठवलेंना फोन आला असून दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचे निमंत्रण दिले असून ते मोदींची भेट घेतील. यासोबतच आज सायंकाळी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -