घरमहाराष्ट्रहा सत्कार एकट्या अजित पवरांचा नाही तर...

हा सत्कार एकट्या अजित पवरांचा नाही तर…

Subscribe

'या स्वागताने मी भारावून गेलो. ज्यांनी मला प्रचंड मतदान केले त्यांचा मी आभारी आहे', असे वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सत्कारप्रसंगी केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीला भेट दिली होती. अजित पवार येणार हे कळताच बारामतीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ‘या स्वागताने मी भारावून गेलो. ज्यांनी मला प्रचंड मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. त्यामुळे हा सत्कार माझ्या एकट्याचा नाही’. असे देखील ते पुढे म्हणाले.

हा सत्कार माझ्या एकट्याचा नाही

‘ज्यांनी मला प्रचंड मतदान केले, त्यांचा हा सत्कार आहे. १ लाख ६५ हजारांचे मतधिक्य विभानसभेला मिळणे ही मोठी गोष्ट आहे. एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिल आहे. त्यामुळे हा माझा एकट्याचा सत्कार नसून हा इथल्या घराघरातल्या प्रत्येकाचा सत्कार आहे’, असे पवार यावेळी म्हणाले. तसेच ‘तुमच्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. हा सर्व बारामतीकरांनी केलेला नागरी सत्कार आहे.

- Advertisement -

बारामती एक कुटुंब

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी १९६७ पासून राजकारणात काम करायला सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत अनेकांना मोठे केले असून बऱ्याचजणांना पदे देखील दिली आहेत. आपण सारे एका घरातल्याप्रमाणे आहोत, हीच शिकवण आम्ही पवार साहेबांकडून घेतली आहे. त्यामुळे बारामती हे एक कुटुंब आहे, असे देखील पवार पुढे म्हणाले.

जाती धर्माचे लोक आले एकत्र

सत्कारामुळे सर्व जातीधर्माचे लोक आज रस्त्यावर आले. खूप आठवणी डोळ्यांसमोर आल्या. तसेच यानिमित्ताने शाळेतील जुने मित्र देखील भेटले. त्याचप्रमाणे यावेळी अनेकांना धक्काबुक्की झाली आहे. त्यामुळे अनेकांना त्रास देखील झाला. त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. त्यामुळे आता ५ वर्षात खूप काम करायचे आहे. विशेष म्हणजे हा विकास केवळ बारामतीचाच नाही तर सर्वच ठिकाणांचा करायचा आहे. मग मुंबऊ असो किंवा पुणे असो.

- Advertisement -

चार दिवस सासुचे..चार दिवस सुनेचे

‘दिवस बदलत असतात. चार दिवस सासुचे आले, तर चार दिवस सुनेचे देखील येतात. विश्वासाला तडा जाऊ न देण्याचे काम करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत. बारामतीतल्या आणि राज्यातल्या अन्य सर्व शहरांमधील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवणार आहोत. तसेच पोलिसांची घरे देखील चांगली करणार आहोत, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.


हेही वाचा – ईडीची चंदा कोचर यांच्यावर कारवाई; घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -